Maharashtra police recruitment 2024 राज्यभरातील पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस आणि राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) अंमलदार (शिपाई) आणि विभागातील चालक पदांसाठी १९ जूनपासून मैदानी चाचणीतून भरती प्रक्रियेची सुरुवात होत आहे. हजारो पदांच्या भरतीसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. या प्रक्रियेनंतर ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अंदाजे सात हजार पोलिसांची भरती होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली Maharashtra again police recruitment for 7000 posts.
वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची गरज: अनेक शहरांचा विस्तार वाढला आहे, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वीचे मनुष्यबळ कमी पडत आहे. ज्या शहर-जिल्ह्यात नवीन पोलिस ठाण्यांची गरज आहे, वाहतूक शाखा, क्राईम ब्रॅंच, पोलिस शिपाई अशी पदे कमी आहेत, त्यांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर करावेत, असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे. यामुळे मनुष्यबळ वाढवून मिळू शकते.
गृह विभागाची बदलती धोरणे: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दोनवेळा पोलिस भरती पार पडली आहे. त्यांच्या कार्यकाळात १९७६ चा गृह विभागाचा आकृतीबंध बदलून नवीन तयार केला गेला. वाढती गुन्हेगारी, शहर-जिल्ह्यांचा विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. मागील अडीच-तीन वर्षात ३० हजार पोलिसांची भरती झाली आहे. राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता देखील वाढविण्यात आली आहे आणि तेथील नवप्रविष्ठ पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे.
भरती प्रक्रिया आणि आदेश: गृह विभागाने सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना १ सप्टेंबरपर्यंत १४ हजार ४७१ पदांची पोलिस भरती पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत २५ जिल्ह्यात पोलिस शिपाई, आठ जिल्ह्यात चालक शिपाई आणि पाच जिल्ह्यात बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर नवीन पोलिस भरतीला सुरवात होणार आहे.
भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज: सध्याच्या १७ हजार ४७१ पोलिस पदांसाठी राज्यभरातून १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापूर्वी १३ लाख उमेदवारांनी पोलिस भरतीसाठी अर्ज केले होते. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस पदांच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या पोलिस भरतीला सुरवात होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
Maharashtra police recruitment 2024 नवीन भरतीसाठी तयारी: राज्यातील अनेक उमेदवारांना पोलिस दलात सामील होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेला उत्साहात प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील सुरक्षेचा आणि व्यवस्थेचा विचार करून ही भरती प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरणार आहे.