Kalyan Dombivli municipal corporation (KDMC) Recruitment 2024 कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने विविध पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये परीक्षा घेण्यात येणार नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.
KDMC भरती 2024: परीक्षा न करता नोकरीची संधी
भरती पदांचा तपशील | KDMC Recruitment 2024
- वाहतूक अधिकारी
- प्रशासकीय अधिकारी
- आर्थिक नियोजन (CA) अधिकारी
- माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापकीय अधिकारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पात्र उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून आवश्यक पात्रता तपासावी. जाहिरात वाचल्यानंतरच अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांनी 01 ऑगस्ट 2024 ते 12 ऑगस्ट 2024 या कालावधीत खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा:
पत्ता: कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड मुख्यालय, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम.
अधिकृत जाहिरात | पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया
प्राप्त अर्ज आणि कागदपत्रांची छाननी केल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जाहिरात परिषदेच्या तारखेस जास्तीत जास्त 65 वर्षे असावे. त्यापेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
उमेदवारांसाठी सूचना
सदरील भरती ही एकत्रित मानधानवर आधारित आहे. यामुळे कोणताही संवर्गीय फायदा मिळणार नाही. कराराच्या आधारावर नियुक्त केलेल्या व्यक्तींनी प्रस्तावित कामात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होणार नाही, असे अपेक्षित आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या कामाची हमी म्हणून बंदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या भरती प्रक्रियेतून इच्छुक उमेदवारांना सरकारी नोकरीची चांगली संधी मिळू शकते. इच्छुकांनी तत्काळ अर्ज सादर करावेत.