अनंत यांच्या लग्नाला येण्यासाठी कोणता फॉर्म कोणाला भरावा लागला.? एन्ट्रीसाठी काय होते नियम ? | anant ambani wedding

Anant Ambani wedding अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाला देश-विदेशातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. सुरक्षा व्यवस्थेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक पावलावर पोलीस आणि खासगी सुरक्षा गार्ड उपस्थित होते. तरीदेखील, न बोलवताच दोन पाहुणे या कार्यक्रमाला पोहोचले होते.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नातील सुरक्षा व्यवस्था आणि अनपेक्षित पाहुण्यांची एन्ट्री | anant ambani wedding

लग्नाच्या प्री-वेडिंगला क्यूआर कोडची विक्री झाल्याने अनेक न बोलवता पाहुणे पोहोचले होते. त्यामुळे अंबानी कुटुंबाने या वेळेस खूप कडक सुरक्षा व्यवस्था केली होती. लग्नाचे कार्ड वाटतानाच प्रत्येक सेलिब्रिटींना गुगल फॉर्म भरून येण्याचे अप्रूवल घ्यावे लागले होते. अप्रूवल मिळाल्यावर, त्यांना येण्याची वेळ कळवावी लागणार होती. सहा तास आधी प्रत्येक पाहुण्याला क्यूआर कोड पाठवण्यात येत होता. या क्यूआर कोडद्वारे त्यांची ओळख पटवली जात होती.

सुरक्षेच्या दृष्टीने, पाहुण्यांच्या हातावर वेगवेगळ्या रिस्ट बँडचे चिन्ह होते. या रिस्ट बँडद्वारे पाहुण्यांना त्यांच्यासाठी निश्चित क्षेत्रातच जायचं होतं. त्यामुळे जरी कोणीतरी सुरक्षा व्यवस्था पार करुन आत आले असते, तरी ते लगेच सापडले असते. अंबानी कुटुंबाने विवाह स्थळी डॉक्टरांची व्यवस्थाही सज्ज ठेवली होती.

निमंत्रणाशिवाय आलेल्या दोन पाहुण्यांना कदाचित या क्यूआर कोडच्या व्यवस्थेबद्दल कल्पना नसावी. त्यांना आंध्र प्रदेशातून येताना पकडण्यात आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या कठोर सुरक्षा व्यवस्थेमुळेच अनपेक्षित पाहुण्यांची एन्ट्री रोखता आली.

सुरक्षा चक्र भेदून मुख्य कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात होते. पण प्रत्येक पावलावर उपस्थित पोलिसांनी आणि सुरक्षा गार्डांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. त्यामुळेच हा कार्यक्रम निर्विघ्न पार पडला.

हे सुद्धा नक्की वाचा:- मोबाईल फोनवरून कोणाचीही कॉल हिस्ट्री काढा: सायबर सेलची गरज नाही |how to find call history

Leave a Comment