धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र मध्ये लघुलेखक पदासाठी महाभरती सुरू | Charity Commissioner Maharashtra Bharti 2024

Charity Commissioner Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार धर्मदायी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून लघुलेखक (उ.श्रे) आणि लघुलेखक (क.श्रे) या संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही एक चांगली व उत्तम संधी आहे.

धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र भरती 2024 : Charity Commissioner Maharashtra Bharti 2024

भरती विभाग: आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई

भरती प्रकार: सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची संधी

भरती श्रेणी: राज्य सरकार (महाराष्ट्र शासन)

पदाचे नाव: लघुलेखक

रिक्त पदांची संख्या: 04

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात वाचावी.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी अटी व नियम

  • स्वयंघोषणापत्र: अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तींनी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  • बंधनपत्र: करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास नेमून दिलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. उमेदवाराने रु. १००/- च्या स्टॅम्पपेपरवर बंधपत्र देणे आवश्यक आहे.
  • विभागीय चौकशी: अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तींविरुद्ध कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन प्रकरण चालू अथवा प्रलंबित नसावे. याबाबत संबंधित कार्यालयाकडून प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
  • हितसंबंध जाहीर करणे: करार पध्दतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींनी गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक आहे.
  • प्रवास व दैनिक भत्ता: करार पध्दतीने नियुक्त व्यक्तींना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास निवृत्तीच्या वेळच्या वेतनमानानुसार प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहील.
  • गोपनीयता: करार पध्दतीने नियुक्त व्यक्तींनी प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे, माहिती, कामाबाबत व आधारसामुग्री बाबत गोपनीयता पाळणे बंधनकारक आहे.
अर्जाची प्रक्रिया : अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जुलै 2024 आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावेत. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

हे सुद्धा नक्क वाचा:- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये नवीन पदांची मोठी भरती चालू