crop loan waiver 2024 Maharashtra government राज्यातील शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. पुण्यात झालेल्या एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनीही ही मागणी मांडली आहे. तेलंगणात शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांनी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी | crop loan waiver 2024 Maharashtra government
मंगळवारी (ता.१६) अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री शिंदे यांनी या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलून तातडीने विचार करावा, अशीही विनंती त्यांनी केली आहे. सत्तार यांनी याबाबतची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना दिली.
३० दिवसांत कर्जमाफीची मागणी
अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना ३० दिवसांत कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तातडीने विचार करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. सध्या यासाठीची पडताळणी सुरू असून तशी माहिती गोळा केली जात आहे. मंत्री सत्तार यांनी सरकारच्या उत्पन्नाचा विचार करून सरकारच्या सहानुभूतीने कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावा, असे सांगितले आहे.
तेलंगणातील कर्जमाफीचे उदाहरण
तेलंगणात ४० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ३१ हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिली. या घोषणेमुळे राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना पिकांचा उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. मागील वर्षी सोयाबीन, कापूस या पिकांना हमीभावाइतका दर मिळाला नाही. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. गेल्या वर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती होती. परिणामी, शेतकऱ्यांना पीक कर्ज घेऊन शेतीमध्ये खर्च करूनही हाती काही लागले नाही.
मंत्री सत्तार यांची कर्जमाफीची मागणी
मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याबाबत तातडीने विचार करून महिनाभराच्या आत निर्णय घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता मंत्री सत्तार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीनंतर मुख्यमंत्री शिंदे याबाबत काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.