Fruit Crop Insurance राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने फळ पिक विमा योजनेच्या (Fruit Crop Insurance) अनुदान हप्त्यांचे वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे २०२३-२४ आणि २०२४-२५ या मृगबहार आणि आंबिया बहार या चारही हंगामांसाठी विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शेतकरी फळ पिक विमा मिळण्यासाठी प्रतीक्षेत होते. विमा मंजूर होऊनही अनुदान रक्कम वितरित होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता शासनाने विमा कंपन्यांना थकबाकी व अनुदान स्वरूपातील निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचा हप्ता जमा होणार आहे.
असा असेल निधीचा वितरण आराखडा
शासनाने पिक विमा कंपन्यांना खालील प्रमाणे निधी वितरित करण्याचे आदेश दिले आहेत –
✅ आंबिया बहार २०२४-२५: ₹१५९ कोटी (अग्रिम स्वरूपात)
✅ मृगबहार २०२४-२५: ₹२६ कोटी
✅ आंबिया बहार २०२३-२४: ₹१० कोटी (उर्वरित हप्ता)
✅ मृगबहार २०२३-२४: ₹६-७ लाख (उर्वरित निधी)
वाचा:- १ रुपयांत पीक विमा योजना बंद होणार; सविस्तर वाचा काय आहे कारण ..? | crop insurance scheme
Fruit Crop Insurance नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आधार
२०२३-२४ च्या दोन्ही हंगामांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले.
🔹 मृगबहार हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले.
🔹 आंबिया बहार हंगामात काही भागांमध्ये गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर, पिक विम्याचा हप्ता मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विमा कंपन्यांना निधी वितरणाचे आदेश
या निर्णयानुसार पिक विमा कंपन्यांना लवकरात लवकर विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पिक विमा मंजूर झाले आहेत, त्यांना लवकरच विमा हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे.
शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार असून, भविष्यातही अशा योजनांचा लाभ तत्काळ मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील राहील.
हे सुद्धा नक्की वाचा:- लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जमा, मार्चचा हप्ता लवकरच; इथे पहा तारीख व वेळ..!|ladki bahin march installment date Maharashtra