gram panchayat Bharti 2024 Maharashtra ग्रुप ग्रामपंचायत मध्ये 7वी, 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सफाई कर्मचारी पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती अनुसार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिक माहिती साठी बातमी च्या शेवटी अधिकृत जाहिरातीची लिंक दिली आहे, कृपया जाहिरात पहा.
ग्रुप ग्रामपंचायत भरती 2024: 7वी, 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
भरती संदर्भात महत्वाची माहिती:
- भरती विभाग: ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत
- पदाचे नाव: सफाई कर्मचारी
- शैक्षणिक पात्रता: 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण किंवा शिक्षण नसलेलेही उमेदवार अर्ज करू शकतात
- वेतन: महिला – ८५००/- रुपये, पुरुष – १००००/- रुपये
- वयोमर्यादा:
- खुला वर्ग – ३८ वर्षे
- मागासवर्गीय – ४३ वर्षे
- भरती कालावधी: ११ महिन्यांसाठी तात्पुरती निवड
- एकूण पदे: 05
- नोकरी ठिकाण: सावरोली, ता. खालापूर, जि. रायगड
Gram Panchayat Bharti 2024 अर्ज पद्धती:
सदर भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसहित आपले अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: कृपया जाहिरात पहा
अर्जाची अंतिम तारीख: 25 जुलै 2024
इतर महत्वाची माहिती:
- ग्रामपंचायत सावरोली हद्दीतील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- सफाई कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे साक्षांकीत करून जोडावीत.
- उमेदवारांची तोंडी मुलाखत घेतली जाईल व नियुक्ती पत्र दिले जाईल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (लागू असेल तर)
- आधार कार्ड
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- जाती प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना:
अर्जाचा नमुना पाहण्यासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा.