खुशखबर..! 10 वी पास वर होमगार्ड भरती सुरू; ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक इथ पहा |Home Guard Bharti 2024

Home Guard Bharti 2024 Maharashtra last date महाराष्ट्रातील होमगार्ड संघटनेची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संघटनेचा उद्देश राज्यातील नागरीकांना सैनिकी, आपतकालीन मदतकार्य, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे प्रशिक्षण देऊन शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा आहे. या वर्षी 10वी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये होमगार्ड भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

होमगार्ड भरतीचे नियम व अटी: Home Guard Bharti 2024 Maharashtra last date

  1. होमगार्ड पात्रतेचे निकष:
    • शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण (SSC) असणे आवश्यक आहे.
    • शारिरीक पात्रता:
      • वय: 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षांच्या आत.
      • उंची: पुरुषांसाठी 162 से.मी., महिलांसाठी 150 से.मी.
      • छाती (फक्त पुरुष उमेदवारांसाठी): न फुगविता किमान 76 से.मी., किमान 5 से.मी. फुगविणे आवश्यक.
  2. शारिरीक क्षमता चाचणी: उमेदवारांना प्रत्येक शारिरीक चाचणी प्रकारात 40% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या धावणे व गोलफेक चाचण्या घेतल्या जाणार नाहीत.

भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  1. रहिवासी पुरावा, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र.
  2. शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र (10वी मार्कशीट / प्रमाणपत्र).
  3. जन्मदिनांक पुराव्यासाठी SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
  4. तांत्रिक अहर्ता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  5. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
  6. 3 महिन्यांच्या आत पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज भरणे संदर्भात सूचना: Home guard bharti online apply

  1. होमगार्ड नोंदणीचे अर्ज इंग्रजी भाषेमध्ये वरती दिलेल्या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.
  2. उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्या पोलीस ठाणे अंतर्गत अर्ज दाखल करता येईल.
  3. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जाऊन त्याची छायांकीत प्रत काढावी. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठीमध्ये नाव स्वतः पेनाने लिहावे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये.
  4. जाहिरातीत नमूद दिनांकाशी संबंधित कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीसाठी येताना, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः सोबत आणावेत. दोन फोटो व मूळ कागदपत्रे नोंदणीच्या वेळी पडताळणीसाठी बंधनकारक असतील.
होमगार्ड भरती मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे:

  1. सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनामूल्य सैनिकी प्रशिक्षण.
  2. 3 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या होमगार्डना राज्य पोलीस दल, वनविभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण.
  3. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन या सारख्या विषयांमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध.
  4. गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार/पदके मिळविण्याची संधी.
  5. स्वतःचा व्यवसाय/शेती इ. सांभाळत देशसेवा करण्याची संधी.

महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख: 31 जुलै 2024
  • कागदपत्र पडताळणी व शारिरीक क्षमता चाचणीच्या तारखा अर्जांची छाननी झाल्यानंतर जाहीर केल्या जातील.

अर्ज भरणे कसे करावे:

  1. होमगार्ड विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Registration मेनू निवडावा.
  2. जिल्हा निवडावा.
  3. पोलीस ठाण्याचे क्षेत्र निवडावे.
  4. आधार क्रमांक, लिंग, पूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ईमेल आयडी, तांत्रिक अर्हता, जन्मदिनांक, उंची इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी.
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  6. अर्जाची तपासणी करून अर्ज SUBMIT करावा.

होमगार्ड भरतीसाठी आवश्यक सर्व माहिती व अर्ज करण्याच्या पद्धतीवरील या मार्गदर्शकाने तुम्हाला नक्कीच मदत होईल. अधिक माहितीसाठी व ताज्या अपडेट्ससाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. अधिकृत संकेतस्थळ वर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

हे सुद्धा नक्की वाचा:- महाराष्ट्रात पुनः पोलिस भरती होणार; तब्बल 7 हजार जागांची होणार भरती; पहा अर्ज कधी चालू होणार

Leave a Comment