कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024: नोकरीची संधी! थेट मुलाखत, कोणतीही परीक्षा नाही | kolhapur mahanagarpalika recruitment 2024

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नसून थेट मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिका पद भरती तपशील | kolhapur mahanagarpalika recruitment 2024

  • स्त्रीरोगतज्ज्ञ
  • भूलतज्ज्ञ
  • रेडिओलॉजिस्ट
  • ऑर्थोपेडिक सर्जन
  • वैद्यकीय अधिकारी
एकूण रिक्त जागा : 9+ रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण: कोल्हापूर
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख: 15 जुलै 2024

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज व मुलाखतीचा पत्ता: इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खालील पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे:
  • पत्ता: आरोग्य प्रशासन कार्यालय, मुख्य इमारत, कोल्हापूर महानगरपालिका
  • मुलाखतीची वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 12.00
  • मुलाखत सुरु होण्याची वेळ: दुपारी 3.00, उप-आयुक्त (2) कार्यालय
  • पगार:- पगार पदानुसार वेगवेगळा असेल.

उमेदवारांसाठी अटी व शर्ती | kolhapur mahanagarpalika recruitment 2024

  1. तात्पुरती नेमणूक: सदरची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपातील असल्याने उमेदवारांची निवड स्थानिक परिस्थिती व गरजेनुसार केली जाईल.
  2. जन्मतारखेचा पुरावा: उमेदवारांनी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
  3. अपूर्ण अर्ज: विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज व अपूर्ण किंवा चुकीचे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  4. प्रवासी भत्ता: मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही, त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित रहावे लागेल.
  5. कामाचे स्वरूप: कामाचे स्वरूप ठरविण्याचे सर्वस्वी अधिकार वैद्यकीय विभाग प्रमुखांना राहतील. रुग्णालयाच्या सोयीनुसार सेवा देणे बंधनकारक असेल.
  6. नवीन मुलाखत: जर आवश्यक संख्या प्राप्त न झाल्यास, प्रत्येक आठवड्याच्या दर सोमवारी मुलाखत घेण्यात येईल.

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज करावा व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित रहावे. ही एक उत्कृष्ट संधी आहे ज्यात थेट मुलाखतीद्वारे नोकरी मिळवण्याची संधी आहे.

हे सुद्धा नक्की वाचा:- मोबाईल फोनवरून कोणाचीही कॉल हिस्ट्री काढा: सायबर सेलची गरज नाही |how to find call history

Leave a Comment