ladki bahin march installment date Maharashtra राज्यातील महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यावर आता महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात हप्त्यांचे वितरण करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे १५००-१५०० रुपये असे एकत्र जमा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात १५०० रुपयेच जमा झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधकांनी सरकारवर महिलांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
या आरोपांवर स्पष्टीकरण देताना मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे माहिती दिली की, ७ मार्च २०२५ पासून या हप्त्यांचे वाटप सुरू झाले असून, १२ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता देखील जमा केला जाणार आहे. त्यामुळे महिलांनी कोणतीही चिंता करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजना अपात्र यादी इथे पहा
लाडकी बहिण योजनेचा लाभ किती महिलांना?
मंत्री तटकरे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे २ कोटी ५२ लाख महिलांना लाभ मिळणार आहे. सरकारने हे पैसे युद्धपातळीवर वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ७ मार्चपासून सुरू झालेली ही प्रक्रिया १२ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
२१०० रुपये कधीपासून मिळणार?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत महिन्याला २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. या संदर्भात विचारले असता, मंत्री तटकरे यांनी सांगितले की, याबाबतचे नियोजन सुरू असून लवकरच हे आश्वासन पूर्ण केले जाईल. योजनेच्या पुढील टप्प्यांमध्ये प्रत्येक लाभार्थी महिलेला २१०० रुपये मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू असून, लाभार्थींनी कोणतीही शंका बाळगू नये, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे, असेही तटकरे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
हे सुद्धा नक्की वाचा:- गाडीचे इन्शुरन्स असेल तरच मिळेल पेट्रोल डिझेल; पहा नवीन नियम काय म्हणतोय..? vehicle insurance new rules 2025