लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला तरी ‘या’ महिलांना मिळणार नाहीत १५०० रुपये! पहा काय आहे कारण..? | ladki bahin yojana 1500 rupees

ladki bahin yojana 1500 rupees लाडकी बहीण योजनेच्या अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्रातील महिलांमध्ये सध्या मोठी धावपळ सुरू आहे. आत्तापर्यंत दीड कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत आणि ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. मात्र, या योजनेसाठी सर्व अर्जदार महिलांना लाभ मिळणार नाही. प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संख्या दीड कोटींच्या घरात राहण्याचा अंदाज आहे.

या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. फक्त महाराष्ट्रातील महिला यासाठी पात्र ठरतील. परंतु, ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असून त्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल, त्या देखील या योजनेसाठी पात्र ठरतील.

या महिलांना लाभ मिळणार नाही:
  1. कौटुंबिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही.
  2. अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना, ज्यांना आधीच १५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ मिळतो, त्या अपात्र ठरतील.
  3. वय २१ वर्षांपेक्षा कमी किंवा ६५ वर्षांपेक्षा जास्त असणाऱ्या महिलांना लाभ मिळणार नाही.
  4. महाराष्ट्र राज्याबाहेरील महिलांना लाभ मिळणार नाही, पण महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केलेल्या महिलांना लाभ मिळू शकतो.
  5. चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असलेल्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.
  6. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबातील शासकीय सेवेत कार्यरत सदस्य असल्यास, लाभ मिळणार नाही.
  7. निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळवणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.
  8. आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.
  9. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहेत, त्या महिलांना लाभ मिळणार नाही.
  10. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन / उपक्रमांचे अध्यक्ष / उपाध्यक्ष / संचालक / सदस्य आहेत, त्या महिलांना लाभ मिळणार नाही.

या योजनेच्या लाभांची रकम जुलै महिन्यापासून पात्र महिलांच्या खात्यावर जमा केली जाईल, आणि रक्षाबंधनापूर्वी ती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांसाठी ही रक्षाबंधनाची एक मोठी भेट ठरणार आहे.

हे सुद्धा नक्की वाचा:- लाडकी बहीण योजने मध्ये सरकारने केले 12 मोठे बदल ; कोणाचा फायदा तर कोणाचे नुकसान इथे पहा |ladki bahini yojana new update