ladki bahini yojana new update महाराष्ट्र राज्यातील महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत काही महत्वपूर्ण सुधारणा आणि व्याप्ती वाढवण्याचे निर्णय घेतले आहेत. या ब्लॉग पोस्टमध्ये आपण या योजनेंतर्गत घेतलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
योजनेंची पार्श्वभूमी
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणाच्या स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने, तसेच कुटुंबातील त्यांची नेतृत्व भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची सुरुवात 28 जून 2024 रोजी शासन निर्णयाद्वारे करण्यात आली होती.
अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
योजना कार्यान्वित करण्यासाठी घेतलेले निर्णय
1. कुटुंबाची व्याख्या
सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले/मुली अशी करण्यात आली आहे.
2. नवविवाहित महिलांसाठी
नवविवाहित महिलांचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य नसल्यास, विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा महिलांचे पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला मानण्यात येणार आहे.
3. परराज्यात जन्मलेल्या महिलांसाठी
परराज्यात जन्म झालेल्या आणि सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केल्यास, त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा निवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
4. बँक खाते
योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरले जाईल.
5. लाभार्थ्यांची नोंदणी
योजनेच्या ऑफलाइन अर्जातील लाभार्थी महिलांच्या फोटोंचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्जात दाखल करण्याची प्रक्रिया ग्राह्य धरली जाईल.
6. प्राधिकृत कर्मचारी
नागरी आणि ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि लाभ | Ladki Bahin Yojana Online Application
केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ PFMS-DBT प्रणालीद्वारे दिले जातात. या योजनांमध्ये PM-KISAN, POSHAN, MGNREGS, PM-Svanidhi, JSY, PMMVY इत्यादी योजनांचा समावेश आहे. या योजनांचे लाभार्थी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी पात्र असतील तर त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यावर KYC आणि आधार प्रमाणीकरण होईल.
1. ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
गावपातळीवर ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक इत्यादी कर्मचार्यांनी लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल.
2. लाभार्थ्यांची यादी
ग्रामस्तरीय समितीद्वारे लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करून ती ग्रामपंचायत आणि अंगणवाडी केंद्रात प्रसिद्ध करण्यात येईल. यादीतील हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण केले जाईल.
3. प्रोत्साहन भत्ता
पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची यादी ऑनलाईन अपडेट झाल्यावर, प्रत्येक अर्जासाठी रु.50/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.
निष्कर्ष
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेत सुधारणा करून महिलांच्या सशक्तीकरणाला आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक विकासाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेमुळे महिलांना अधिकाधिक फायदा होईल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता येईल.