LPG Gas New Rules नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा घरगुती गॅस ग्राहक आहात अर्थातच सर्वजण आहेत तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणज आता वर्षभरामध्ये काही लिमिटेड गॅस टाक्या आपल्याला मिळणार आहेत. त्या किती मिळणार आहेत.? हे आता आपल्याला जाणून घ्यायचा आहे. केंद्र सरकारच्या उज्वला या योजनेअंतर्गत देशभरामधील गोरगरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळाल्यामुळे आता आपल्या देशामध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापर हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
गॅस सिलेंडर मुळे खेडेगावातील चुली आता जवळपास बंद पडलेले आहेत आणि यामुळे खेडेगावातील महिलांना मुलींना मोठा दिलासा मिळालेला आहे. एस दरम्यान तुम्ही सुद्धा घरगुती गॅस सिलेंडरचे वापर करते आहात तर तुमच्यासाठी गॅस कंपनीचे काही नवीन नियम अपडेट झालेले आहेत हे तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे.
मित्रांनो एका वर्षामध्ये एका कुटुंबाला किंवा एका कनेक्शन असेल यांना किती गॅस सिलिंडर देऊ केल्या जातात याबाबतचे नियम कंपनीने तयार केलेले आहेत. यानुसार एका वर्षामध्ये आता बारा गॅस सिलेंडर एका कनेक्शन ला दिले जाणार आहेत म्हणजेच तुमचं जे एक गॅस कनेक्शन आहे त्या एका गॅस कनेक्शनला वर्षभरामध्ये बारा टाक्या मिळणार आहेत.
मित्रांनो यापेक्षा अधिक सिलेंडर तुम्हाला लागत असतील तर आणखी तीन सिलेंडर म्हणजेच 15 गॅस टाकी आपल्याला दिल्या जाणार आहेत. पण यावर गॅस सिलेंडर सबसिडी मिळणार नाही यामध्ये पूर्णपणे आपल्याला पैसे घ्यावे लागणार आहेत. अशा तऱ्हेने एका वर्षामध्ये एका गॅस सिलेंडर ग्राहकांना फक्त पंधरा गॅस सिलेंडर मिळणार आहेत. संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त 213 किलो पेट्रोलियम गॅस आपल्याला म्हणजेच एलपीजी उपलब्ध होणार आहे असा निर्णय कंपनीने घेतलेला आहे.
मित्रांनो 213 किलो गॅस म्हणजेच 14.2 किलोग्रॅम गॅस टाकी प्रमाणे धरून 15 गॅस सिलेंडर एका वर्षामध्ये या होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या कुटुंबाला यापेक्षा जास्त गॅस सिलेंडरची गरज भासली तर मग काय करायचे हा प्रश्न सर्व नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे.
15 सिलेंडरपेक्षा जास्त टाकी लागल्यास काय करावे.?
यावर दुसरे काही नियम नसून घरात जास्त गॅस टाकी यांचा खप होत असेल म्हणजेच गॅस सिलेंडर जास्त लागत असतील तर आपल्याला यासाठी स्वतंत्र वेगळे कनेक्शन घ्यावे लागणार आहे. ज्या घरांमध्ये जास्त सदस्य एकत्र राहत आहात तेथे दर महिन्याला एक गॅस टाकी पुरत नाही. अशा कुटुंबाला महिन्याला एकापेक्षा अधिक सिलेंडर लागू शकतात सन किंवा लग्न समारंभामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर जास्त प्रमाण होतो.
पण मित्रांनो एका महिन्यात दोन सिलेंडर घ्यायचे असतील तर अशा कुटुंबांना कमीत कमी दोन कनेक्शन घ्यावे लागणार आहेत. तसेच नवीन कनेक्शन घेण्यासाठी वेगळ्या स्वरूपात पैसे देखील खर्च करावे लागणार आहेत.