Msrtc Bus Update नमस्कार मित्रांनो, आपण एखाद्या बसची बुकिंग केली आहे अथवा आपण एखाद्या बस मध्ये बसून कुठल्यातरी गावी जाणार आहोत तर ही माहिती आपल्याला अगदी काही एका क्लिकमध्ये पाच मिनिटात समजणार आहे. आणि ही माहिती कशा पद्धतीने आपल्याला समजणार आहे हे सुद्धा आपण या पोस्टमध्ये आता पाहत आहोत. सहसा आपण पाहत असतो की आपल्याला कुठेतरी गावी जायचं आहे आणि आपण बसची वाट बघत बसलेलो असतो आणि आपली बस अकरा वाजता येणार असतील पण ती निर्धारित वेळेत येत नाही काही तांत्रिक अडचणीमुळे ती एक ते दीड घंटा उशिरा होऊ शकते किंवा रद्द देखील होऊन जाते त्यामुळे आपल्याला नाह त्रास होऊन जातो. आणि आता अशाच त्रासाला प्रवाशांना सामोरे जाण्याची गरज नाही. त्याकरिता एसटी महामंडळाने एका अपडेट आणला आहे आणि आता एका क्लिप वरती आपल्याला आपली बस कधी येणार आहे हे समजणार आहे आणि सर्व टाईम टेबल सुद्धा कळणार आहे.
रोशनच्या सुख सुविधासाठी एसटी महामंडळ आता अपडेट झाला आहे. आता राज्यातील परिवहन महामंडळ अंतर्गत “व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम” म्हणजेच व्ही टी एस ही यंत्रणा तयार करण्यात आलेली असून प्रणालीची यशस्वी चाचणी सुद्धा आत्ताच करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकरच ही सुविधा आपल्यासाठी सुरू होणार असून या सुविधेमुळे एसटी चा टाईम टेबल आता सर्व प्रवाशांना एका क्लिकवरती पाहता येणार आहे.
एसटी महामंडळ करून प्रवाशांच्या शुक शुभेच्छा दृष्टीने रेल्वे प्रशासनाच्या धर्तीवर ती जसे की रेल्वेची माहिती आपल्याला एका एप्लीकेशन वरती मिळते त्याच पद्धतीने आता एसटी बस सुद्धा कुठे आहे.? आणि कुठून कुठे निघालेली आहे.? यासाठी एक व्ही टी एस यंत्रणा विकसित करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीला एसटी महामंडळ मध्ये जवळपास 16 हजार पेक्षाही अधिक नव्या जुन्या बस मध्ये ही व्ही टी एस प्रणाली बसवण्यात आलेली आहे. यातून समोर आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आलेल्या असून प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली चाचणी देखील सध्या यशस्वी झालेली आहे. मित्रांनो आता लवकरच याचे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर वरती येईल आणि त्यानंतर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून यामध्ये रजिस्ट्रेशन करून आपण आपल्या बसची माहिती मिळवू शकणार आहोत. तसेच एसटी महामंडळ चे सर्व टाईम टेबल आपल्याला या प्रणाली मुळे पाहता येणार आहेत.