लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरा; 50 रुपये प्रति फॉर्म प्रोत्साहन भत्ता मिळवा |Mukhyamantri Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारनं राज्यभरातील महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Ladki Bahin Yojana). या योजनेसाठी गावागावांत आणि जिल्ह्यात महिलांची झुंबड उडाली आहे.

लाडकी बहीण योजना 50 रुपये प्रति अर्ज प्रोत्साहन भत्ता: Mukhyamantri Ladki Bahin Yojana

योजनेची अंमलबजावणी आणि विस्तार: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी आणि सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनानं योजनेची व्याप्ती वाढवली आहे. याअंतर्गत यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. नोंदणी करणाऱ्या घटकांना प्रति फॉर्म 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. वर्धा जिल्हा प्रशासनानं यासंदर्भात माहिती दिली आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया: महिलांना या योजनेसाठी अर्ज करताना अनेक अडचणी येत होत्या, त्यानुसार सरकारनं काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महिलांना आता वेगवेगळ्या पद्धतीनं फॉर्म भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. महिला नारीशक्ती पोर्टल या माध्यमातून अर्ज करू शकतात. याआधी अर्ज करताना लाईव्ह फोटो देण्याची आवश्यकता होती, परंतु आता नव्या निर्णयानुसार त्याची गरज नाही.

योजनेचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

नव्या सुधारणा: नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणं सोपं व्हावं म्हणून ऑफलाईन अर्जावरील फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सोय केली आहे. त्यामुळे महिलांना आता स्वत:चा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही.

अर्ज करण्याची सोपी पद्धत: पात्र महिला योजनेसाठी घरी बसूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा पीडीएफ अर्ज डाऊनलोड करावा लागेल. त्यात नाव, पत्ता, बँकेची माहिती, आधार कार्ड नंबर आणि इतर सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल. नंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पुन्हा वेबसाईटवर अपलोड करावा लागेल. बँक खातं नमूद करताना रक्कम मिळण्याचं खातं द्यावं लागेल. त्यात बँकेचं नाव, खातेधारकाचं नाव, बँक खाता क्रमांक, बँकेचा आयएफएससी कोड भरावा लागेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, तुमचं आधार कार्ड त्या बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक आधार मिळणार आहे, त्यामुळे अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

हे सुद्धा नक्की वाचा:- लाडका भाऊ योजनेचा शासन निर्णय आला; “या” पुरुषांना मिळणार 10 हजार रुपये महिना; लगेच कर अर्ज

Leave a Comment