“या” या नागरिकांना मिळणार 3 हजार रु. महिना; पहा सरकारची कोणती आहे नवीन योजना |mukhyamantri vayoshri yojana Maharashtra

mukhyamantri vayoshri yojana Maharashtra राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरु केली आहे – ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’. या योजनेंतर्गत ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये त्यांच्या बचत खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत. सहाय्यक समाज कल्याण आयुक्त योगेश पाटील यांनी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज करावा, असे आवाहन केले आहे.

वृद्धापकाळानुसार येणारे अपांगत्व आणि शारीरिक अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्रि वयोश्री योजना’ सुरू केली आहे. ही योजना राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने आणि उपकरनं खरेदी करण्यासाठी मदत करेल.

अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मुख्यमंत्री वयोश्री योजना: ज्येष्ठांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजना | mukhyamantri vayoshri yojana Maharashtra

योजनेचे प्रमुख ध्येय

सहाय्य साधनांची खरेदी: ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अशक्तपणा आणि अपांगत्वावर मात करण्यासाठी आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी मदत करणे.

    सहाय्यभूत साधने

    पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार खालील सहाय्यभूत साधने खरेदी करता येतील:

    1. श्रवणयंत्र
    2. चष्मा
    3. ट्रायपॉड
    4. स्टिक व्हीलचेअर
    5. फोल्डिंग वॉकर
    6. कमोड खुर्ची
    7. नी-ब्रेक्स
    8. लंबर बेल्ट
    9. सर्वाइकल कॉलर

    मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य: ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार केंद्रे आणि मनःस्वास्थ्य केंद्रांच्या माध्यमातून सेवा पुरविणे.

    अर्थसहाय्य: पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात एकरकमी रु. ३०००/- अनुदान प्रदान करणे.

    mukhyamantri vayoshri yojana Maharashtra योजनेचे फायदे

    या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणावर उपाययोजना करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. विशेषतः, मन:स्वास्थ्य केंद्र, योगा उपचार केंद्रांद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक साधने खरेदीसाठी त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत.

    योजनेची वैशिष्ट्ये

    1. उपकरणे: चष्मा, श्रवणयंत्र, रायपॉड, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, रन-ब्रैस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ.
    2. अर्थसहाय्य वितरण: नेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे रु. ३०००/- च्या मर्यादेत निधी वितरण.
    3. प्रबोधन व प्रशिक्षण: ज्येष्ठ नागरिकांना प्रबोधन व प्रशिक्षणासाठी विविध केंद्रांद्वारे सेवा उपलब्ध.

    पात्रता निकष

    1. वय: लाभार्थीचे वय ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
    2. आधारकार्ड: आधारकार्ड असणे आवश्यक किंवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा.
    3. उत्पन्न मर्यादा: लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. २ लाखांच्या आत असावे.
    4. मागील लाभ: मागील तीन वर्षात कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण प्राप्त केले नसावे.

    मुख्यमंत्रि वयोश्री योजना आवश्यक कागदपत्रे

    1. आधारकार्ड / मतदार कार्ड
    2. राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स
    3. पासपोर्ट आकाराचे २ फोटो
    4. स्वयंघोषणापत्र

    जागरूकता व प्रचार

    राज्य शासनाच्या मान्यतेने व सहमतीने या योजनेची व्यापक प्रसिध्दी करण्यात येईल जेणेकरून लाभार्थी आणि त्यांचे कुटुंबीय योजनेच्या अस्थित्वाची आणि त्यातील उपलब्ध लाभांची पूर्ण माहिती मिळेल.

    या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनात नवी उमेद आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळेल. त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या योजनेमुळे साध्य होईल.

    हे सुद्धा नक्की वाचा:- लाडकी बहीण योजने मध्ये सरकारने केले 12 मोठे बदल ; कोणाचा फायदा तर कोणाचे नुकसान इथे पहा

    Leave a Comment