Mumbai mahanagar palika recruitment 2024 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सल्लागार (Consultant Epidemiologist), बालरोग तज्ज्ञ (Pediatrician), मानसोपचार तज्ज्ञ (Psychiatrist), शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक (City Quality Assurance Coordinator), आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager) यांसारख्या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा आणि अनुभव अशा विविध गोष्टींची माहिती दिली आहे. सर्व पदांसाठी मानधन दरमहा वेगवेगळ्या प्रमाणात ठरवण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया 23 जुलै 2024 पर्यंत आहे आणि इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे.
सर्व पदे कंत्राटी स्वरूपात असून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत काम केले जाणार आहे. उच्च शिक्षण आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. निवड यादीतील उमेदवारांना मुलाखतीस बोलावले जाईल आणि कामगिरी समाधानकारक असल्यास पुढील नियुक्ती दिली जाईल. करारपद्धतीतील कामगिरी समाधानकारक नसल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल. अधिकृत आदेशानुसार पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो.
मुंबई महानगरपालिका भरती 2024: Mumbai mahanagar palika recruitment 2024
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पदांची माहिती:
सल्लागार (Consultant Epidemiologist)
- कामाचे ठिकाण: बृहन्मुंबई महानगरपालिका
- वयोमर्यादा: खुला – 18 ते 38 वर्षे; अजा/वजा/भजा – 18 ते 43 वर्षे (5 वर्षे सूट)
- शैक्षणिक अहर्ता:
- MBBS, MD (PSM)
- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य
- पदांची संख्या: 4
- खुला – 1
- अ.जा./अ.ज. (आळीपाळीने) – 1
- वि.जा.(अ)/भ.ज. (ब)/भ.ज.(क)/भ.ज.(ड)/वि.मा. (आळीपाळीने) – 1
- इमाव/साशैमा/आदघु (आळीपाळीने) – 1
- मानधन: दरमहा ₹73,500
बालरोग तज्ज्ञ (Pediatrician)
- कामाचे ठिकाण: बृहन्मुंबई महानगरपालिका
- वयोमर्यादा: खुला – 18 ते 38 वर्षे; अजा/वजा/भजा – 18 ते 43 वर्षे (5 वर्षे सूट)
- शैक्षणिक अहर्ता:
- MBBS, MD (Pediatrics)
- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य
- पदांची संख्या: 4
- खुला – 1
- अ.जा./अ.ज. (आळीपाळीने) – 1
- वि.जा.(अ)/भ.ज. (ब)/भ.ज.(क)/भ.ज.(ड)/वि.मा. (आळीपाळीने) – 1
- इमाव/साशैमा/आदघु (आळीपाळीने) – 1
- मानधन: दरमहा ₹75,000
मानसोपचार तज्ज्ञ (Psychiatrist)
- कामाचे ठिकाण: बृहन्मुंबई महानगरपालिका
- वयोमर्यादा: खुला – 18 ते 38 वर्षे; अजा/वजा/भजा – 18 ते 43 वर्षे (5 वर्षे सूट)
- शैक्षणिक अहर्ता:
- MBBS, MD (Psychiatry)
- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य
- पदांची संख्या: 2
- खुला – 1
- अ.जा./अ.ज./वि.जा.(अ)/भ.ज. (ब)/इमाव/भ.ज.(क)/आदघु/भ.ज.(ड)/वि.मा. (आळीपाळीने) – 1
- मानधन: दरमहा ₹75,000
शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक (City Quality Assurance Coordinator)
- कामाचे ठिकाण: बृहन्मुंबई महानगरपालिका
- वयोमर्यादा: खुला – 18 ते 38 वर्षे; अजा/वजा/भजा – 18 ते 43 वर्षे (5 वर्षे सूट)
- शैक्षणिक अहर्ता:
- कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी (MBBS, BDS, BAMS, BHMS, BYUMS) सह MPH/MHA/MBA Healthcare
- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य
- पदांची संख्या: 4
- खुला – 1
- अ.जा./अ.ज. (आळीपाळीने) – 1
- वि.जा.(अ)/भ.ज. (ब)/भ.ज.(क)/भ.ज.(ड)/वि.मा. (आळीपाळीने) – 1
- इमाव/साशैमा/आदघु (आळीपाळीने) – 1
- मानधन: दरमहा ₹35,000
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager)
- कामाचे ठिकाण: बृहन्मुंबई महानगरपालिका
- वयोमर्यादा: खुला – 18 ते 38 वर्षे; अजा/वजा/भजा – 18 ते 43 वर्षे (5 वर्षे सूट)
- शैक्षणिक अहर्ता:
- MBBS किंवा कोणतीही आरोग्यविषयक पदवी (BDS, BAMS, BHMS, BYUMS, BPT/नर्सिंग बेसिक (PBBSC)/B Pharma सह MPH/MHA/MBA Healthcare
- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य
- पदांची संख्या: 2
- वि.जा.(अ)/भ.ज. (ब)/भ.ज.(क)/भ.ज.(ड)/इमाव/आदघु/वि.मा. (आळीपाळीने) – 1
- इमाव/साशैमा/आदघु (आळीपाळीने) – 1
- मानधन: दरमहा ₹32,000
सामान्य अटी:
- रिक्त पदांची संख्या उपलब्धतेनुसार बदलू शकते.
- सदर पदे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत असून पूर्णतः कंत्राटी तत्त्वावर असतील.
- मानधन एकत्रितपणे देण्यात येईल.
- निवड यादीतील उमेदवारांना मुलाखतीस बोलावले जाईल.
- उच्च शिक्षण आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती 29 जून 2025 पर्यंत असले तरी कामगिरी समाधानकारक असल्यास पुढील नियुक्ती देण्यात येईल.
- करारपद्धतीतील कामगिरी समाधानकारक नसल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल.
- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मंजूर कृप अंमलबजावणी आराखड्यानुसार करारपद्धतीची नियुक्ती केली जाईल.
- पदांच्या संख्येत बदल करण्याचे सर्व अधिकार कायकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे असतील.
अर्ज प्रक्रिया:
इच्छुक उमेदवारांनी वरील नमूद आवश्यक पात्रता व अनुभव असलेल्या मूळ कागदपत्रांसह 23 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत सहकार्यकारी आरोग्य अधिकारी (NHM) कार्यालयात अर्ज सादर करावेत.